वीजनिर्मितीत महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

राज्यात 2015-16 मध्ये 9.6 टक्के वाढ
मुंबई - राज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे. 2014-15 मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती झाली; परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा आहे. वीजनिर्मितीत हिमाचल प्रदेश सध्या आघाडीवर आहे. त्याखालोखाल गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि हरियानाचा क्रमांक लागतो.

राज्यात 2015-16 मध्ये 9.6 टक्के वाढ
मुंबई - राज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे. 2014-15 मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती झाली; परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा आहे. वीजनिर्मितीत हिमाचल प्रदेश सध्या आघाडीवर आहे. त्याखालोखाल गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि हरियानाचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात 2015-16 मध्ये एकूण वीजनिर्मितीत पूर्वीच्या वर्षापेक्षा 9.6 टक्के इतकी वाढ झाली असून, 1 लाख 13 हजार 787 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. 2016-17 मध्ये डिसेंबरपर्यंत राज्यात 82 हजार 441 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. एकूण वीजनिर्मितीत "महानिर्मिती'चा वाटा 41.9 टक्के असून, त्याखालोखाल अदानी पॉवर कंपनीचा वाटा 17.6 टक्के, नवीकरणीय ऊर्जा 7.6 टक्के, जेएसडब्ल्यू एनर्जी 7.4 टक्के, टाटा पॉवर 7.1 टक्के, रतन इंडिया पॉवर 5.4 टक्के, व्हीआयपी बुटीबोरी व एम्को पॉवर प्रत्येकी 3.5 टक्के आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर 3.1 टक्के व इतर 2.9 टक्के असा होता.

केंद्रीय क्षेत्राकडून राज्याला 2015-16 मध्ये 29 हजार 179 दशलक्ष युनिट आणि 2016-17 मध्ये डिसेंबर 2016 पर्यंत 22 हजार 436 दशलक्ष युनिट वीज मिळाली. काही दिवसांपासून राज्याने वीजनिर्मितीकडे विशेष लक्ष दिले असून, वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना लागणाऱ्या परवानग्या एक खिडकी योजनेअंतर्गत आणल्यामुळे हा परिणाम दिसत आहे, असे ऊर्जा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

वीजनिर्मितीची वाढ (दशलक्ष युनिट)
स्रोत 2013-14 2014-15 2015-16 2016-17
राज्यामधील 91,987 1,03,779 1,13,787 82,441
औष्णिक 71,686 84,882 94,482 63,972
नैसर्गिक वायूजन्य 6,055 4,626 5,302 7,122
जलजन्य 6,763 5,856 5,045 4,196
नवीकरणीय 7,483 8,415 8,958 7,151
केंद्रीय क्षेत्रातून उपलब्ध 31,525 30,401 29,179 22,436