‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’चा आज दिमाखदार सोहळा!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - मनोरंजन क्षेत्रासाठी मराठीतील एकमेव ग्लॅमरस मासिक म्हणून लौकिक असलेल्या ‘प्रीमियर’चा पहिला ‘सकाळ प्रीमियर सिने ॲवॉर्ड’चा दिमाखदार सोहळा मोठ्या उद्या (ता. १०) प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. सोहळ्याला हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. समाजमनावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या चित्रपटाचा करण्यात येणारा गौरव हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. 

‘सकाळ माध्यम समूहा’चे प्रीमियर हे मासिक हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील घटना-घडामोडींची नोंद घेणारे ग्लॅमरस मासिक अल्पावधीत लोकप्रिय ठरले आहे. त्याची विजयपताका जोमाने फडकत आहे. या मासिकातर्फे मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी कलाकार, तंत्रज्ञ आदींचे कौतुक करण्यासाठी ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ होणार आहे. या वेळी सर्वात्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री आदींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

अभिनेत्री जुही चावला, रवीना टंडन, अभिनेता विवेक ओबेरॉय आणि सयाजी शिंदे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल या पुरस्कार सोहळ्यात घेण्यात येणार आहे. त्यांना सोहळ्यात ‘सकाळ प्रीमियर सोशल इम्पॅक्‍ट ॲवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे. 

हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आदी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. हा पुरस्कार सोहळा फक्त निमंत्रितांसाठीच आहे.