शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला कॉंग्रेस जबाबदार - राजनाथ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत सरकार संवेदनशील आहे. कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांविरुद्ध पोलिसांचा वापर करू नये, असे सांगत, शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला कॉंग्रेसच जबाबदार आहे, हे राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावे, असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (ता. 8) येथे लगावला.

मध्य प्रदेशात शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना राजनाथसिंह म्हणाले, की अशांतता निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना फूस लावली जात आहे, तरीही आम्ही शेतकऱ्यांविरोधी नाही. मध्य प्रदेशातील गोळीबाराप्रकरणी त्यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि त्यांनी आंदोलन थांबवावे, यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत; परंतु त्याला थोडा वेळ लागेल. शेतकऱ्यांची परिस्थिती 2022 पर्यंत सुधारेल. त्यांचे उत्पन्नही वाढेल, असे आम्ही स्पष्ट केले आहे. शेतकरी देशाची संपत्ती आहे; मात्र त्यांच्या समस्यांबाबत राज्य सरकारनेच अंतिम निर्णय घ्यायचा आहे. राज्य सरकारांच्या साह्याने केंद्र सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या पेचप्रसंग आहे; पण सरकार सक्षम असल्याने शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. सुधारत आहे; परंतु कायमस्वरूपी एकात्मिक तोडगा काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असेही राजनाथ यांनी स्पष्ट केले.