महामार्गामुळे शेतकरी "समृद्ध' 

महामार्गामुळे शेतकरी "समृद्ध' 

मुंबई - नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाल्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाधित झालेले शेतकरी खरोखरच समृद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे नुकसानभरपाई मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन शेतीतच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्यातील बाधित शेतकऱ्यांचे "मॅजिक आय' या खासगी संस्थेने सर्वेक्षण केले असून त्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. 

राज्यातील अकरा जिल्ह्यांतून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांनी सुरवातीला विरोध केला होता. मात्र 2014 मध्ये झालेल्या नवीन भूसंपादन कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला खासगी वाटाघाटीतून बाजारभावापेक्षा पाच पट मोबदला मिळाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांना काही कोटी रुपयांचा लाभ झाल्याने आता शेतकऱ्यांचा विरोध मावळला आहे. प्रकल्प बाधित नुकसानभरपाई मिळालेल्या राज्यातील सर्व सहा हजार 486 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून "मॅजिक आय'ने सर्वेक्षण केले आहे. यात मिळालेल्या पैशांतून शेतकरी कोणती गुंतवणूक करणार असल्याचा सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश होता. विशेष म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांनी नवीन शेतजमीन खरेदी करणे, शेतजमीन खरेदी करण्याची इच्छा व्यक्‍त करणे तसेच शेतीपूरक व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांनी अन्य व्यवसायांत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून त्यात जेसीबी खरेदी, ट्रक, ट्रॅक्‍टर, प्रवासी आणि वाहतुकीची वाहने खरेदी आणि म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा समावेश आहे. अनेकांनी शिक्षण आणि कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी रक्‍कम वापरणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

नुकसानभरपाईचा तपशील (रक्कम कोटी रुपयांत) 
जिल्हा शेतकरी संख्या नुकसानभरपाईची रक्‍कम 
नागपूर 231 196.81 
वर्धा 650 310.74 
अमरावती 703 165.41 
वाशीम 829 237.6 
बुलडाणा 981 337.67 
जालना 507 325.3 
औरंगाबाद 1127 964.37 
नगर 174 101.69 
नाशिक 915 532.85 
ठाणे 396 313.60 
एकूण 6486 3494.27 
------------------------------------------------------------- 
शेतकऱ्यांची गुंतवणूक (टक्‍क्‍यांत) 
- नवीन शेती खरेदी - 18 
- शेतीच खरेदी करण्याची इच्छा - 50 टक्‍के 
- शेतीपूरक व्यवसाय - 6 टक्‍के 
- अन्य व्यवसाय - 10 टक्‍के 
- अन्य गुंतवणूक - 45 टक्‍के 
- शिक्षण - 74 टक्‍के 
- कुटुंबीयांना मदत - 71 टक्‍के 

महामार्गासाठी... 

8603 हेक्‍टर 
आवश्‍यक जमीन 

6491 हेक्‍टर 
संपादित जमीन 

6486 
शेतकऱ्यांचे सर्वेक्षण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com