चिनी वस्तूंवर बंदी घाला - सुभाष साबणे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मुंबई - सिक्‍कीमच्या डोकलाम सीमेवर चीन आपल्यावर हल्ला करण्यासाठी उभा आहे. अशा परिस्थितीत चीनच्या वस्तूंवर बंदी घालावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंदीचा वटहुकूम तातडीने काढावा, अशी मागणी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी विधानसभेत शुक्रवारी केली.

चीन आपल्या सीमेवर हल्ल्याच्या सज्जतेने उभा आहे. त्यामुळे देशाने चिनी वस्तूंवर बंदी घातली पाहिजे. चिनी वस्तू आणणे, विकणे आणि विकत घेणे याच्यावर बंदी घालणारा वटहुकूम काढण्यात यावा, अशी मागणी साबणे यांनी केली. भाजपच्या राज पुरोहित यांनीदेखील साबणे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. चिनी वस्तूंवर आपण बहिष्कार घातला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.