चित्रपट कामगार संपाला कॉंग्रेसचा पाठिंबा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई - चित्रपट कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असे अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. निरुपम यांनी गोरेगाव फिल्म सिटी मुख्य प्रवेशद्वाराजवळ चित्रपट कामगारांची शनिवारी भेट घेतली. या वेळी त्यांनी कोणतेही राजकीय वक्तव्य न करता कामगारांच्या सर्व मागण्यांबाबत माहिती घेतली. चित्रपट कामगारांच्या संपामुळे चित्रपटसृष्टीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे आंदोलन असेच सुरू राहिले तर मोठा आर्थिक फटका बसेल.

मुंबई - चित्रपट कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असे अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. निरुपम यांनी गोरेगाव फिल्म सिटी मुख्य प्रवेशद्वाराजवळ चित्रपट कामगारांची शनिवारी भेट घेतली. या वेळी त्यांनी कोणतेही राजकीय वक्तव्य न करता कामगारांच्या सर्व मागण्यांबाबत माहिती घेतली. चित्रपट कामगारांच्या संपामुळे चित्रपटसृष्टीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे आंदोलन असेच सुरू राहिले तर मोठा आर्थिक फटका बसेल. दुसरीकडे या आंदोलनाला आठवडा झाल्यानंतरही कोणीही मोठा कलाकार, निर्माता, दिग्दर्शक संपकरी कामगारांची भेट घेण्यासाठी आला नाही हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.