लघुउद्योग योजनेला अपंगांचा अल्प प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

मुंबई - लघुउद्योग सुरू करण्यासाठी अपंगांना बीज भांडवल योजनेंतर्गत अनुदान दिले जाते; परंतु, या योजनेकडे अपंगांनी पाठ फिरवली आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत अवघे तीन प्रस्ताव अपंग मंडळाकडे आले आहेत. त्यातील एका प्रस्तावाला मंडळाने मंजुरी दिली आहे. 

अपंगांना दीड लाखापर्यंतचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी बॅंकेमार्फत 80 टक्के कर्जसाह्य व अपंग समावेशीत शिक्षण विभागातर्फे 20 टक्के अथवा कमाल 30 हजारांपर्यंत सवलत देण्यात येते. योजनांची घोषणा केल्यानंतर त्याची पुरेशी प्रसिद्धी शासनाकडून केली जात नाही. त्यामुळे ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही. या योजनेबाबतही असेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अपंगांना दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे एसटीच्या प्रवास भाड्यात 75 टक्के आणि त्यांच्यासोबत असलेल्या प्रवाशाला 50 टक्के सवलत देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आवश्‍यक असते. अपंगत्वाचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांहून अधिक असावे, अशी अट आहे. ही सवलत फक्त थेट प्रवासासाठी असते. प्रवासादरम्यान मध्येच चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्या अपंगांना याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे ही चांगली योजना बारगळल्याचे अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबत एसटी प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही.