दोषमुक्त करण्यासाठी चिंतन उपाध्यायचा अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबई - चित्रकार हेमा उपाध्याय व तिचे वकील हरीश भंभानी यांच्या हत्याप्रकरणी हेमाचे पती चिंतन यांच्यावर हत्या आणि कटकारस्थान रचल्याप्रकरणी आरोपही ठेवणे आवश्‍यक आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या हत्या प्रकरणात पोलिसांकडे आपल्याविरोधात कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी आपल्याला दोषमुक्त करावे, अशी मागणी करत चिंतन उपाध्यायने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

दुहेरी हत्याकांडाचा तपास मुंबई पोलिसांकडून नीट होत नाही. या प्रकरणात आपल्याला नाहक गोवले आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र तपास अधिकारी नेमावा, दोषमुक्त करण्याच्या अर्जावर निर्णय होत नाही, तोपर्यंत दिंडोशी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्याने अर्जात केली आहे.