"मैत्री'तून 90 हजार कोटींची गुंतवणूक 

"मैत्री'तून 90 हजार कोटींची गुंतवणूक 

मुंबई - राज्यात उद्योग आणि गुंतवणूक करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करता यावे, तसेच उद्योग उभारणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी "मैत्री' (MAITRI) हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे 500 उद्योगांना "मैत्री'च्या माध्यमातून 90 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस मदत झाली आहे. या उद्योगातून अंदाजे एक लाख 70 हजार रोजगार मिळवून देण्यास मदत होणार आहे. 

"इज ऑफ डुईंग बिझनेस' अंतर्गत उद्योग उभारणीची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी "मैत्री' कक्ष व "मैत्री' वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. या मार्फत 17 विभागाच्या उद्योग संबंधित 44 सेवा ऑनलाइन पोर्टल www.mahaonline.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वदेशी व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना उद्योजकांसाठी आवश्‍यक नियामक दस्तऐवज एकाच स्थळावरून जमा करता येतात. सरकारच्या संस्थांशी समन्वय करणे हा "मैत्री'चा मुख्य उद्देश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com