सत्यशोधन चाचणीसाठी उच्च न्यायालयात अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्येच्या मृत्यूप्रकरणी नऊ जणांची नॉर्को चाचणी, ध्वनिविश्‍लेषण, ब्रेन मॅपिंग आणि सत्यशोधन चाचणी (लाय डिटेक्‍टर) करण्याच्या अर्जावर शुक्रवारी युक्तिवाद झाला. मृत्यू प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्याची मागणी मंजुळाचे भाऊ गोविंद शेट्ये यांनी केली आहे. 

मंजुळाच्या मृत्यूप्रकरणी तुरुंग प्रशासनातील सहा जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिस उपायुक्त परिमंडळ 3, गुन्हे शाखा कक्ष 3 चे वरिष्ठ निरीक्षक राजवर्धन सिन्हा, (उपमहानिरीक्षक) स्वाती साठे, जे.जे.चे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, चंद्रमणी इंदुलकर, डॉ. खान, घरबुडवे यांची ब्रेन मॅपिंग आणि सत्यशोधन चाचणी करावी, अशी मागणी मंजुळाचे भाऊ गोविंद शेट्ये यांच्या वतीने ऍड. नितीन सातपुते यांनी किल्ला न्यायालयात केली होती. त्यांच्या अर्जावर आज युक्तिवाद झाला. त्यावर 2 ऑगस्टला पुढील सुनावणी होईल. घटनेच्या दिवशी एकमेकांच्या संपर्कात असलेल्यांचे सीडीआर काढण्यात यावे, त्यांचे ध्वनिविश्‍लेषण करावे आणि त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा शोध घेण्यात यावा, यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आल्याचे सातपुते यांनी सांगितले. 

""मंजुळाच्या हत्येचा तपास पारदर्शक व्हावा. गुन्हे शाखेचे पोलिस बऱ्याच गोष्टी लपवत आहेत. 15 दिवसांपूर्वी पोलिसांनी माझा जबाब नोंदवून घेतला होता, त्याची प्रत अजून दिलेली नाही. जबाबामध्ये पोलिस फेरफार करतील, अशी आम्हाला भीती आहे. तसेच, मंजुळाचा शवविच्छेदन अहवालही मिळालेला नाही. हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्यात यावा, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि साक्षीदारांना संरक्षण द्यावे,'' अशी विनंती गोविंद शेट्ये यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे.