'अध्यक्षपदाची इच्छा नाही, मात्र आग्रह झाल्यास तयार'

'अध्यक्षपदाची इच्छा नाही, मात्र आग्रह झाल्यास तयार'

मुंबई - नाट्य परिषदेचा पुन्हा अध्यक्ष होण्याची इच्छा नाही; मात्र आग्रह झाल्यास रंगभूमीच्या सेवेसाठी आपण तयार आहोत. अशी संधी मिळालीच तर अपुरी कामे पूर्ण करू, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते, नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी सोमवारी (ता. 19) येथे मांडली. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्ताने मोहन जोशी पॅनेलतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. 4 मार्चला मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतून जोशी यांचा अर्ज बाद झाला आहे; मात्र सुधारित घटनेचा आधार घेऊन जोशी पुन्हा अध्यक्षपदाचे दावेदार होऊ शकतात. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. पत्रकार परिषदेत मोहन जोशी पॅनेलने प्रसाद कांबळी यांच्या "आपलं पॅनेल'ने केलेले आरोप फेटाळले आहेत. यशवंत नाट्यमंदिराचा पूर्णपणे वापर होत आहे. कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कुणीही कामांना विरोध केला नाही. त्याचा सर्व तपशील इतिवृत्तांमध्ये आहे, असे जोशी यांनी सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल मेसेज, फेसबुक पोस्ट याबाबत पॅनेलच्या प्रवक्‍त्या निर्मात्या लता नार्वेकर म्हणाल्या, की राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचा कांबळी यांना पाठिंबा हे वृत्त सपशेल खोटे आहे. तावडे यांनी त्याचा इन्कार केला आहे. प्रसाद कांबळी यांचे अध्यक्षपदासाठी सातत्याने फोन येत होते, याचा पुनर्उच्चारही नार्वेकर यांनी केला. तर मोहन जोशी पॅनेलखाली प्रसाद कांबळी यांनी उभे राहावे, अशी विनंती केली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याचे देवेंद्र यादव यांनी सांगितले. 

वचननामा सादर 
बॅकस्टेज कलावंतांसाठी घरे, नाट्य परिषदेच्या शाखांचे विस्तारीकरण अशा अनेक कामांचा वचननामा जोशी यांच्या पॅनेलद्वारे सादर करण्यात आला. मोहन जोशी पॅनेलमध्ये  विजय कदम, दीपक करंजीकर, अमोल कोल्हे, विजय गोखले, दिलीप दळवी, शकुंतला नरे, सविता मालपेकर, देवेंद्र यादव, चारुशीला वाच्छानी, सुशांत शेलार, विजय सूर्यवंशी हे उमेदवार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com