मुंबई विद्यापीठाला भुर्दंड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील ग्रंथालयाच्या बांधकामात दिरंगाई होत असल्याने विद्यापीठाला आर्थिक फटका बसला आहे. दीड वर्षापासून धीम्या गतीने बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तब्बल दोन कोटी ४७ लाखांचा वाढीव खर्च विद्यापीठाला करावा लागत आहे.  माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना ही माहिती मिळाली आहे. 

विद्यापीठाच्या ‘आंबेडकर भवन’लगत ग्रंथालयाचे बांधकाम सुरू आहे. १८ फेब्रुवारी २०१५ रोजी या बांधकामाला सुरुवात झाली. केवळ नऊ महिन्यांत बांधकाम पूर्ण करायचे होते. या दोन मजली इमारतीचे बांधकाम दीड वर्षांपूर्वी सुरू झाले तेव्हा २४ कोटी ८६ लाख ३० हजार १२५ रुपये एवढा खर्च अपेक्षित होता. ३ जुलै २०१७ पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर आता दोन कोटी ४६ लाख ६० हजार २७४ रुपये वाढीव खर्च विद्यापीठाला करावा लागणार आहे.

काम वेळेत पूर्ण न झाल्याने आज मोडकळीस आलेल्या ग्रंथालयात हजारो विद्यार्थी जीव संकटात घालून ये-जा करतात. ज्या उद्देशाने विद्यापीठाने हे बांधकाम सुरू केले, त्याला हरताळ फासत वाढीव रकमेची खिरापत देण्याच्या या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.
- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते