नवमतदारांना लोकशाहीचे धडे! 

किरण कारंडे
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - राज्यातील नव्या मतदारांना केंद्रस्थानी ठेवून राज्य निवडणूक आयोगाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. "लोकशाही, निवडणूक, सुशासन' हा विषय पदवीच्या पहिल्या वर्षाकरता सुरू करण्यात येणार आहे. 

मुंबई - राज्यातील नव्या मतदारांना केंद्रस्थानी ठेवून राज्य निवडणूक आयोगाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. "लोकशाही, निवडणूक, सुशासन' हा विषय पदवीच्या पहिल्या वर्षाकरता सुरू करण्यात येणार आहे. 

पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी राज्यातील नवे आणि पहिले मतदार म्हणून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होतात. अशा विद्यार्थ्यांना लोकशाही म्हणजे काय, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य कोणती, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य, सुशासन आदी गोष्टी समजावून सांगण्यासाठीच हा विषय सुरू करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या नागरिक आणि राज्यशास्त्र विभागाने पदवी अभ्यासक्रमासाठीचे "मॉड्युल' तयार केले आहे. टप्प्याटप्प्याने शालेय विद्यार्थ्यांसाठीही अशाच स्वरूपाच्या अभ्यासक्रमाचा समावेश होणे अपेक्षित आहे. 

सध्याच्या "एफसी' विषयाऐवजी आता "लोकशाही, निवडणूक आणि सुशासन' हा विषय पदवीच्या पहिल्या वर्षात शिकवला जाईल. एका आठवड्यात या अभ्यासक्रमाच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली. राज्यातील सर्वच विद्यापीठांनी त्यासाठी होकार दर्शवला आहे. नवमतदार म्हणून या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्‍वास नागरिक आणि राज्यशास्त्र विभागाच्या पथकाने व्यक्त केला आहे. 

राज्य सरकार आणि सर्व विद्यापीठांकडे आम्ही या अभ्यासक्रमासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सर्वच विद्यापीठांनी होकार दिला आहे. नव्या मतदारांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. 
- जे. एस. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्त.