वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळाची स्थापना 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई - महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ १५ ऑगस्टपूर्वी स्थापन करू, अशी घोषणा राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेसोबत मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.

विक्रेता संघटनेने त्यासाठी तत्काळ आपल्या प्रत्येक शहर व जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची आधार कार्डद्वारे नोंदणी पूर्ण करावी. त्यामुळे कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळण्यास त्यांना मदत होईल, असे पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले. वृत्तपत्रविक्रेते दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांना न्याय द्यावाच लागेल, अशी ठाम भूमिका देसाई यांनी मांडली. 

संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी विक्रेत्यांच्या मागण्या सविस्तर मांडण्याची मागणी करत वृत्तपत्रविक्रेता कल्याणकारी मंडळाच्या स्वरूपाबाबत सविस्तर प्रस्ताव सादर केला. सरचिटणीस बालाजी पवार यांनी वृत्तपत्रविक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांसाठी घरकुल, आरोग्य, शिक्षण आदी कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशी मागणी केली. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्रच कल्याणकारी मंडळ असावे, अशी सूचना संघटनेचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी केली. कल्याणकारी मंडळाच्या लाभासाठी नावनोंदणी करताना वृत्तपत्रविक्रेता संघटनेची शिफारस आवश्‍यक असावी, अशी सूचना कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांनी केली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्रविक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरी पवार, संघटन सचिव संजय पावसे, संचालक सदा नंदूर, मनोहर परब, विकास आयुक्त (विकास) पंकजकुमार, सहायक कामगार आयुक्त सुनीता म्हैसकर, सहसचिव ए. पी. विधले आदी बैठकीला उपस्थित होते.