'नितेश राणे, बेताल वक्तव्य करू नका'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई -  कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी सवंग प्रसिद्धीसाठी बेताल वक्‍तव्ये करू नयेत. सिंधुदुर्गमध्ये काही दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनानंतर नितेश यांची अटक टाळण्यासाठी मी काय काय केले, याची जाहीर वाच्यता करण्यास त्यांनी मला भाग पाडू नये, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिटोला लगावला. 

विखे-पाटील यांच्या कामगिरीबाबत नितेश राणे यांनी टीका केली होती. याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, नितेश राणे यांना राजकारणात खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. विधिमंडळातील कामकाजाबाबत त्यांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. राजकीयदृष्ट्या ते अजून अपरिपक्‍व आहेत. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी नितेश राणे यांना अटक करण्याची पूर्ण तयारी केली होती. त्या वेळी कॉंग्रेसचा आमदार म्हणून मी काय काय प्रयत्न केले, याबाबतची जाहीर वाच्यता करायला त्यांनी भाग पाडू नये; अन्यथा त्यांची अडचण होईल. 

कॉंग्रेसला राणेंची गरज! 
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची पक्षाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडू नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, असे विखे-पाटील या वेळी म्हणाले.

Web Title: mumbai news Radhakrishna Vikhe-Patil