सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांना मुंबई सायबर क्राइमकडून नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मुंबई - सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून नोटीस पाठविण्यात येत आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील 15 ते 20 तरुणांना नोटीस पाठवून 3 दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्याचे मुंबई सायबर विभागाकडून सांगण्यात आले आहे. बदनामी करणे, फसवणूक करणे या कलमांचा उल्लेख नोटिशीत आहे. बनावट फेसबुक प्रोफाइलवरून मुख्यमंत्री कार्यालयाची कथित बदनामी केल्याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडे नोंद असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी या तरुणांना चौकशीसाठी बोलविण्यात आल्याचे सायबर सेलने ई-मेलद्वारे कळविले आहे. 

राज्यातील ज्या तरुणांना अशा प्रकारची नोटीस आली आहे ते सर्व साधारणतः 25 ते 30 या वयोगटातील आहेत. यामध्ये विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण सरकारची धोरणे, महागाई, मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, भ्रष्टाचाराची प्रकरणे यावर सोशल मीडिया आणि इतर माध्यमांत सतत लिखाण करत असतात. सरकारविरोधात लिहिणाऱ्या तरुणांना अशाप्रकारच्या नोटिसा पाठवून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

ट्‌विट 
Dhananjay Munde @dhananjay_munde 
सोशल मीडियावरच्या टीकेनं सरकारच्या अस्तित्वाला धक्का दिला आहे. त्यांची पोलखोल झाली आहे. अशा पोलिस चौकशीचा ससेमिरा हा आणीबाणीपेक्षा भीषण आहे. 

Web Title: mumbai news social media Mumbai Cyber Crime