उद्धव ठाकरे यांचा आजपासून मराठवाड्यात झंझावात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून (ता. 29) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात ठाकरे हे विविध ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. या वेळी ते शेतकऱ्यांबरोबर संवाद साधणार असून, ते संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारवर टीकेची झोड उठवण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केली आहे. तरीही "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे' ही शिवसेनेची भूमिका आहे. याविषयी जाहीर सभांमधून ठाकरे आपले मत मांडतील. कर्जमाफी आणि त्यांची अंमलबजावणी करताना आपले बारीक लक्ष राहणार आहे, हे ठाकरे सरकारला सांगणार आहेत. 

शिवसेनेच्या रेट्यामुळे सरकारला अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. याचा उल्लेख या दौऱ्यांतील सभांमधून ठाकरे करणार असल्याचे समजते. त्यांच्या तरोडा, (जि. नांदेड), बसमत (जि. हिंगोली), श्रीकृष्ण गार्डन, सेलू, (जि. परभणी), मंठा, रामनगर, बदनापूर (जि. जालना) आदी ठिकाणी सभा होणार आहेत.