आठवडे बाजार कोपर्डीत सुरू 

आठवडे बाजार कोपर्डीत सुरू 

कर्जत - शाळकरी मुलीवरील अत्याचार व खुनामुळे राज्याला परिचित झालेल्या कोपर्डीत आजपासून आठवडे बाजार सुरू झाला. त्या घटनेनंतर काहीशा धास्तावलेल्या महिला, मुली बाजारात खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्या. गावात प्रथमच भरलेल्या आठवडे बाजाराचे अप्रूप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले जात होते. पहिल्याच बाजारात तब्बल सहा लाखांची उलाढाल झाल्याचे समजते. 

कोपर्डीलगत कुळधरणकडे जाताना जंगल लागते. बऱ्याच वेळा हा परिसर निर्जन असतो. दैनंदिन गरजांच्या वस्तू खरेदीसाठी येथील गावकऱ्यांना पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. कोपर्डीतील दुर्दैवी घटनेनंतर बाजारासह इतर खरेदीसाठी महिलांनी बाहेर पडणेच बंद केले होते. त्यामुळे घरातील पुरुषच भाजी खरेदीही करीत. या भागात बरेच शेतमजूर, भाजीपाला पिकविणारे शेतकरी आहेत. मात्र, त्यांनाही पिकविलेला भाजीपाला विकण्यासाठी कुळधरण किंवा बाहेर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे गावातच आठवडे बाजार भरविण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड यांच्या हस्ते आज सकाळी आठवडे बाजारास प्रारंभ झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com