नाणारच्या रणांगणात "शिवसेना विरूद्ध राणे'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई - नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्पावरून शिवसेना सरकारच्या विरोधात आक्रमक झालेली असताना नाणार ग्रामस्थांनी थेट शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे. मात्र, या नवीन वादामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष पुन्हा कोकणच्या रणांगणात पेटण्याचे संकेत आहेत.

भाजप सरकार नाणारचे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करत असून, नारायण राणेंना पुढे करून शिवसेनेला लक्ष्य करण्याचे षडयंत्र आखल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. "नाणारच्या ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार घातला नसल्याचा दावाही राऊत यांनी केला.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे शिवसेनेचे असतानाही शिवसेना मात्र नाणारला विरोध करत आहे. शिवसेनेचा हा दोन्ही दगडावर ठेवलेला पाय असल्याचा संताप नाणार प्रकल्प विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे. मात्र, या समितीच्या सदस्यांनी या अगोदर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर भेट घेतली होती. आता मात्र, सरकारने काढलेला नाणार प्रकल्पाचा अध्यादेश राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी मागे घेण्याचे धाडस दाखवावे. त्यानंतरच शिवसेनेच्या आंदोलनाबाबतची विश्‍वासार्हता वाढेल असे नाणार ग्रामस्थांचे मत आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला आहे. यामुळे, शिवसेना विरूद्ध नाराणय राणे हा मागील पंधरा वर्षापासून सुरू असलेला संघर्ष आता नव्याने नाणार प्रकल्पाच्या विरोधातून उफाळण्याचे संकेत आहेत.

Web Title: nanar project shivsena oopose narayan rane politics