कोल्ड प्ले विरोधात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा 'हॉट प्ले बँड'

nawab malik
nawab malik

मुंबई: गरिबी हटावच्या नावाखाली भाजपा खा. पूनम महाजन यांच्या माध्यमातून ब्रिटनच्या ‘कोल्ड प्ले बँडचे’ आयोजन करण्यात आले आहे.  या 'कोल्ड प्ले बँड' कार्यक्रमाच्या विरोधात मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईत ‘हॉट प्ले बँड’ विनामूल्य वाजविण्यात येणार असून या कार्यक्रमात पुर्णपणे दारूला बंदी असणार आहे आणि गरीब लोकांना याचा आनंद घेता यावा यासाठी बीकेसीच्या सहा रस्त्यावर ‘हॉट प्ले बँड’ वाजविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले

याविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले , 'सरकारने ‘कोल्ड प्ले बँडला’ विविध करात सुट दिली आहे. या कार्यक्रमात दारू पिण्याची समंती दिलेली आहे. तसेच या कार्यक्रमाच्या तिकिटाचे दर हे महाग असून याचा लाभ गरिब जनतेला मिळणार नाही.'

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकामधून १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्विकारण्यावर रिझर्व बंदी घातलेली आहे. याबाबत बोलताना मलिक म्हणाले, 'जिल्हा मध्यवर्ती बँकांना नोटा बदलीसाठी परवानगी नाकारुन सरकारने ग्रामीण जनतेची आर्थिक कोंडी केलेली आहे. जर या बँकांना सरकारने नोटा बदलण्याची परवानगी दिली असती तर शेतकरी वर्ग व ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळाला असता. परंतु सरकारने जिल्हा बँका व सहकारी बँकावर अविश्वास दाखवून सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केलेली आहे. सरकारी बँकाप्रमाणे जिल्हा बँका व सहकारी बँकाना देखील केंद्र सरकारने समान वागणूक दिली पाहिजे.' जर सरकारचा या बँकावर विश्वास नसेल तर एकवेळ मंत्रालय बंद करून तेथील बाबू लोक जिल्हा बँकेत बसवा आणि नोटा बदलीच्या निर्णयाची अंमलबजावणी करा. परतुं ग्रामीण भागातील शेतकरी जनतेला त्रास देऊ नका असा इशारा मलिक यांनी यावेळी दिला.

'नोटबंदीच्या निर्णयानंतर सरकारतर्फे रोज तुघलकी निर्णय बाहेर येत आहेत. केंद्रीय वित्त सचिव संसदेला टाळून रोज नवी नवी घोषणा करत आहेत. बोटाला शाई लावणे,पैसे काढण्याची मर्यादा ४५०० वरून पुन्हा २००० वर आणणे अशा प्रकारचे नवनवे निर्णय रोज लोकांसमोर मांडले जात आहेत. लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट नाही. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अनुकूल नाही. मात्र उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केली जात आहेत. यावरूनच सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आणि उद्योगपतींच्या बाजूने असल्याचे दिसून येते, 'अशी टिकाही मलिक यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com