नीलम गोऱ्हे यांना जिवे मारण्याची धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - आपल्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची तक्रार शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आपल्याला धमकीचे मेसेज येत असल्याचे गोऱ्हे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रार करूनही गुन्हेगाराला अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश मिळत नसल्याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

महापालिका निवडणुकीचा प्रचार 21 फेब्रुवारीला थांबल्यानंतर गोऱ्हे यांच्या मोबाईलवर अश्‍लील आणि जिवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आला होता. याबाबत मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोऱ्हे यांनी सांगितले की, संबंधित मेसेजची माहिती मुंबईचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त देवेन भारती यांना मी ताबडतोब कळवली. त्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार संबंधित क्रमांक मी ब्लॉक केला. मात्र, दोन दिवसांपूर्वी पुन्हा तशीच धमकी दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर आल्याने याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवली.

याप्रकरणी पुणे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचा दिलासा आपल्याला दिल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. आपला कोणावरही संशय नसून, अशाप्रकारे धमकाविणाऱ्याला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: neelam gorhe threatening to kill