दाऊदशी संबंधित २० ठिकाणांवर छापे

‘एनआयए’ची कारवाई; सलीम फ्रूट, सोहेल खांडवानी ताब्यात
Dawood ibrahim
Dawood ibrahimsakal

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या मुंबई आणि ठाण्यातील २० हून अधिक ठिकाणांवर आज छापे घातले. छाप्यांनंतरर ‘एनआयए’ने दाऊदचा विश्वासू समजला जाणारा साथीदार सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट, माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खांडवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, हाजी अली दर्गा विश्वस्त समितीच्या सदस्यांची काही वेळ चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले.

गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने दाऊद इब्राहिम, तसेच डी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ही चौकशी आणि छापेमारी करण्यात आल्याचे कळते. एनआयएच्या पथकाने सकाळपासून छापेमारी करण्यास सुरुवात केली. भेंडीबाजार, माहीम, बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ आणि ठाण्यातील मुंब्रा भागातील जवळपास २० ठिकाणांवर एनआयएच्या पथकाने छापेमारी केली. डी कंपनी ही संयुक्त राष्ट्राने प्रतिबंध घातलेली दहशतवादी संघटना आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदला २००३ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

गृह मंत्रालयाने फेब्रुवारी महिन्यात दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता. यापूर्वी हा तपास ‘ईडी’कडे होता. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार डी कंपनी आणि दाऊद इब्राहिम टेरर फंडिंगद्वारे भारतात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. तसेच लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल्-कायदाच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करत आहेत. या यादीत छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमन यांचाही समावेश आहे. एनआयए केवळ दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांचा तपास करणार नसून, अंडरवर्ल्ड डॉनचे गुंड छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची (मृत), दाऊदची बहीण हसिना पारकर (मृत) यांच्याशी संबंधित दहशतवादी कारवायांचाही तपास करणार आहे.

रडारवरील व्यक्ती

  • सलीम कुरेशी, छोटा शकील याचे नातेवाईक

  • सोहेल खांडवाणी आणि त्याचा विश्वस्त माही

  • हाजी अली दर्गा विश्‍वस्त

  • अस्लम सोराटिया

  • फरीद कुरेशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com