उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे 'गजनी'; नीतेश राणेंकडून खिल्ली

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 जुलै 2017

भाजप आमचा मित्र पक्ष आहे, एनडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध, जीएसटीला विरोध, कर्जमाफीला विरोध, सत्तेत आहे आणि समृद्धीला शिवसेनेचा विरोध आहे आदी मुद्याकडे राणे यांनी या चित्रातून लक्ष वेधले आहे. 

मुंबई : कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडविली आहे. या चित्रातून त्यांनी उद्धव यांची संभावना 'गजनी'अशी केली असून, या चित्रावरून शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्‍यता आहे.

महाराष्ट्राचे गजनी अशी उपाधी उद्धव ठाकरेंना देऊन नितेश यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. गजनी चित्रपटात अभिनेता अमीर खान याने त्याच्या शरीरावर विविध शब्द आणि ओळी गोंदवून घेतल्या होत्या. या चित्रपटात त्याने उद्योगपती संजय सिंघानियाची भूमिका साकारली होती. खलनायकाने एकदा डोक्‍यावर जोरदार प्रहार केल्याने स्मरणशक्ती गमावलेला सिंघानिया अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या शरीरावरच गोंदवून घेतो, अशी या चित्रपटाची कथा होती. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांची अवस्था झाल्याचे नितेश यांनी रेखाचित्राच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सुचवले आहे. 

भाजप आमचा मित्र पक्ष आहे, एनडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध, जीएसटीला विरोध, कर्जमाफीला विरोध, सत्तेत आहे आणि समृद्धीला शिवसेनेचा विरोध आहे आदी मुद्याकडे राणे यांनी या चित्रातून लक्ष वेधले आहे. 

आम्ही राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेऊ हे वाक्‍य उद्धव ठाकरे यांनी हजारदा उच्चारले आहे. त्यामुळे त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, असे नितेश राणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले होते.

सरकारनामावरील राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:
जमिनी नसणाऱ्यांकडून  महामार्गाचे राजकारण​
शिवसेना- भाजपचे सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा : अजित पवार
सत्ताधारी आघाडीबरोबर आणखी 25 आमदार?​
नगरसेवकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ​
साताऱ्याची कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर !​
'शिवसेना शेर तर राष्ट्रवादी सव्वाशेर'​