अंड्यात प्लॅस्टिक नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मुंबई - ठाणे, डोंबिवली परिसरांतील त्या अंड्यांच्या नमुन्यात कोणत्याही प्लॅस्टिकसदृश वस्तू आढळल्या नाहीत, असे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) स्पष्ट केले आहे.

मुंबई - ठाणे, डोंबिवली परिसरांतील त्या अंड्यांच्या नमुन्यात कोणत्याही प्लॅस्टिकसदृश वस्तू आढळल्या नाहीत, असे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) स्पष्ट केले आहे.

एफडीएने 22 नमुन्यांच्या तपासणीनंतर हा निष्कर्ष काढला. याबाबतचा अहवालही नुकताच जाहीर करण्यात आला. अंड्याचे कवच आणि बलक यांची तपासणी "एफडी'एच्या प्रयोगशाळेत करण्यात आली. पिवळ्या बलकासोबतचा पांढऱ्या रंगाच्या द्रवपदार्थाचीही चाचणी करण्यात आली; परंतु त्यात काहीही आढळले नाही. शिवाय या अंड्यांमध्ये प्लॅस्टिकसदृश काही आहे का, याचीही चाचणी करण्यात आली; परंतु सर्व 22 नमुन्यांमध्ये तसे काहीही आढळले नाही. प्लॅस्टिकची अंडी सापडल्याची तक्रार केल्यानंतर अंड्यांचे नमुने घेण्यात आले होते.