वीजबिल ऑनलाइन भरणा १३६ कोटींवर!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रातील ८ लाख ७३ हजार वीज ग्राहकांनी बिलापोटी डिसेंबर महिन्यात सुमारे १३५ कोटी ६२ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजदेयकांच्या ‘ऑनलाइन’ भरण्याकडे वीज ग्राहकांचा कल वाढला आहे. 

पुणे जिल्ह्यात गेल्या डिसेंबर महिन्यात ६,५८,८३० वीज ग्राहकांनी १०६ कोटी रुपयांची वीजबिले ‘ऑनलाइन’ भरली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ६१,८०५ ग्राहकांनी ९ कोटी ३६ लाख, सांगली जिल्ह्यात ३३,५२२ ग्राहकांनी ६ कोटी ६९ लाख, सातारा जिल्ह्यात ८३,१९८ ग्राहकांनी ८ कोटी ४० लाख आणि सोलापूर जिल्ह्यातील ३६,०६४ ग्राहकांनी ६ कोटी १४ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. महावितरणने लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाइन’ बिल भरणासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास बिलात दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय आहे.

महावितरणने www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ‘ऑनलाइन’ बिल भरणा सुविधेसह महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. 

सर्व लघुदाब वीज ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेट बॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्डसचा पर्याय उपलब्ध झाला आहे.