पवार यांच्या वॉर्डत 'राष्ट्रवादी'चा उमेदवार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 214 मध्ये मतदानाचा हक्‍क बजावला.

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 214 मध्ये मतदानाचा हक्‍क बजावला.

शरद पवार यांच्यासोबत त्यांचे जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे यांनीही मतदानाचा हक्‍क याच मतदान केंद्रावर बजावला. रेवती ही पहिल्यांदाच मतदान करत असल्याने तिचे मत कोणाच्या पारड्यात पडले असेल याबाबत चर्चा सुरू होती. या वॉर्डमध्ये शिवसेनेचे अरविंद बने, भाजपचे अजय पाटील, तर कॉंग्रेसचे कौशिक शहा असे उमेदवार होते.

ज्या प्रभागात शरद पवार यांचे मतदान आहे, त्या प्रभागात पक्षाचा उमेदवारच नसावा याबाबत मात्र "राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी या प्रभागात उमेदवार का दिला नाही, याबाबत चर्चा सुरू होती; मात्र शरद पवार यांनी पक्षाचा उमेदवार नसतानाही पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावला, यामुळे राजकीय वर्तुळात पवारांचे मत कुणाला, अशी मार्मिक चर्चा सुरू होती. सोशल मीडियाही यात मागे नव्हती. मतदानानंतर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

महाराष्ट्र

मुंबई - 'खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणून निकष लावण्यात आले आहेत....

05.54 AM

मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या...

05.21 AM

राज्य सरकारकडून निधीसाठी सातत्याने पाठपुरावा मुंबई - एड्‌स आणि गुप्तरोग...

05.06 AM