यंत्रमागाचे रॅपियर लुममध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - साध्या यंत्रमागाचे रॅपियर लुममध्ये रूपांतर केल्यास उत्पादन क्षमतेत वाढ होईल, यासाठी केंद्र शासनाच्या नवीन योजनेनुसार राज्याच्या योजनेत बदल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे सांगितले. 

सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेणाऱ्या बैठका मंत्रालयात देशमुख यांच्या दालनात घेण्यात आल्या. त्या वेळी वस्त्रोद्योगमंत्री बोलत होते. 

साध्या यंत्रमागचे आधुनिकीकरण करणे गरजेचे असून हे करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे 7 टक्‍यापर्यंतचे व्याज आणि नवीन लुमसाठी घेतलेल्या कर्जाच्या 10 टक्के पर्यंतचे व्याज शासनाकडून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. सूतगिरण्यांना जाणवणारा कापसाचा तुटवडा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून, ज्या सूतगिरण्यांना राज्य शासनाने भाग भांडवल दिलेले आहे, अशा सूतगिरण्यांना वर्षाला सुमारे 7.5 लाख इतक्‍या गाठींची आवश्‍यकता असते. कापूस दरामध्ये होणाऱ्या चढ उतारामध्ये उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होतो. अशा वेळी कापूस पणन महासंघाने कापूस खरेदी करून व त्याची साठवणूक करावी. ज्या वेळेस सूतगिरण्यांना कापसाचा तुटवडा जाणवेल त्या वेळी किफायतशीर भावाने तो पुरवठा करावा. यासंदर्भातला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले. 

अनुदान देऊनही महामंडळे तोट्यात 
वस्त्रोद्योग महामंडळ, यंत्रमाग महामंडळ, हातमाग महामंडळ व महाटेक्‍स या महामंडळांना वर्षानुवर्ष शासन अनुदान देत असून, ही महामंडळे तोट्यात आहेत. वास्तविक इतक्‍या वर्षात ही महामंडळे स्वावलंबी व्हायला हवी होती. सर्व महामंडळांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांची लवकरच बैठक बोलाविण्यात येईल. नियोजित बैठकीमध्ये या महामंडळांनी स्वावलंबी होण्यासाठी व नफ्यात येण्यासाठी ते काय काय उपाय योजना करणार आहेत. याबाबत अहवाल महामंडळांनी सादर करावा, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या.

टॅग्स