सिंहगडावर दरड प्रतिबंधक जाळ्या

सिंहगडावर दरड प्रतिबंधक जाळ्या

मुंबई - सिंहगड किल्ल्याकडे जाणारा साडेसात किलोमीटरचा घाट रस्ता दरडप्रवण झाला आहे. पावसाळ्यामध्ये दरड, माती, मुरुमामुळे तो निसरडा होऊन धोकादायक बनला आहे. त्यामुळे त्याचे काम कधी होणार, त्यासाठी किती निधीची तरतूद केली आहे, या तारांकित प्रश्‍नांवर गुरुवारी गदारोळ झाला. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘मार्चपूर्वी सिंहगड घाट रस्त्यावर संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण केले जाईल.’’ 

पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी प्रश्नोत्तर सत्राच्या सुरवातीला सिंहगड घाट रस्त्याला दरड प्रतिबंधक जाळ्या बसविण्याबाबत तारांकित प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वन राज्यमंत्री रवींद्र पोटे म्हणाले, ‘‘एकूण साडेसात किलोमीटर रस्त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ६ कि.मी., तर दुसऱ्या टप्प्यात दीड कि.मी. रस्त्याच्या कडेला दरड संरक्षक जाळी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आयआयटी पवईकडून सर्वेक्षण अहवाल मिळाल्यानंतर कामाला सुरवात होणार आहे.’’ या उत्तरावर राष्ट्रवादीचे गटनेते आमदार अजित पवार, काँग्रेसचे नेते पतंगराव कदम, शशिकांत शिंदे, दिलीप वळसे पाटील यांनी आक्षेप घेतला. 

यावर अजित पवार म्हणाले, ‘‘पावसाळ्यामध्ये दरड, मुरूम, मातीमुळे सिंहगड रस्ता निसरडा बनतो. घाटकोपर दुर्घटनेसारखे कोणीतरी मृत्युमुखी पडण्याची वाट पाहायची का? वनमंत्री मुनगंटीवार गैरहजर असून, चंद्रकांत पाटील तुम्ही काहीच का बोलत नाही?’’ 

तर, पतंगराव कदम म्हणाले, ‘‘आमच्या कार्यकाळात सिंहगड किल्ल्यासह राज्यातील किल्ल्यांच्या रस्त्यांसंदर्भात वन आणि पर्यटन विभागाचा सामंजस्य करार झाला आहे. सिंहगड रस्त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. फक्त पाच कोटी म्हणजे लॉलिपॉप होईल.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com