कौशल्य व नेतृत्वविकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी...

कौशल्य व नेतृत्वविकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी...

पुणे - प्रत्येक तरुण व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्याची आकांक्षा असते आणि त्यासाठी उद्योजक किंवा कार्यकुशल कर्मचारी बनण्याची संधी ते शोधत असतात. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी आणि रचनात्मक प्रशिक्षणाशिवाय हे स्वप्न प्रत्यक्षात येणे शक्‍य नाही. 

‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’च्या (एसआयएलसी) पुढाकाराने ‘सिमॅसिस’ आणि ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’ (यिन) यांनी ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ची घोषणा केली आहे. यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव व प्रात्यक्षिकांमधील कौशल्ये शिकवण्यात येणार असून, त्याद्वारे प्रशिक्षणार्थींना उद्योजक किंवा कुशल कर्मचारी म्हणून भविष्यात करियरच्या चांगल्या संधी मिळू शकतील. 

या बारा महिन्यांच्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट ‘सिमॅसिस’च्या मूल्यांमध्येच आहे. समाजात सकारात्मक व शाश्‍वत परिणाम घडवून आणणे, स्वतःचा आणि कुटुंबाचा परिपूर्ण विकास, नावीन्यपूर्ण व क्रांतिकारक उपाययोजना आणि या प्रशिक्षणार्थींचे एका यशस्वी उद्योजकात किंवा कार्यक्षम कर्मचाऱ्यांत रूपांतर करणे, ही या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्ये आहेत. 

हा प्रोग्रॅम कौशल्यविकासासाठी सुयोग्य व्यासपीठ असून, त्यात तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून कोठूनही व कधीही शिकण्याची मुभा आहे. तुम्ही प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभाग, लाइव्ह वेबिनार्स, इंटर्नशिप, प्रोजेक्‍ट, व्यावसायिक कौशल्यविकास प्रशिक्षण, मेन्टॉरशिप आणि इनक्‍युबेशन किंवा सीड फंडिंगच्या माध्यमातून यामध्ये सहभागी होऊ शकता. 

या बारा महिन्यांच्या अभ्यासक्रमात आठ महिने व्हिडिओ, वेबिनार्स, असेसमेंट्‌स आणि स्टडी मटेरिअल या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. एक महिना पूर्णपणे प्रकल्पावर काम किंवा इंटर्नशिप आणि तीन महिन्यांची स्टार्टअप स्पर्धा किंवा व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. 

वर्गाच्या भिंतींच्या चौकटीपलीकडे जाऊन प्रशिक्षण हे या अभ्यासक्रमाचे वेगळेपण आहे. प्रत्यक्ष व्यवहारात सहजपणे वापरता येऊ शकेल असे प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण यातून मिळेल. या उपक्रमाद्वारे ध्येयवादी विद्यार्थी व प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून मूल्याधारित समाजाची निर्मिती होईल. हा अभ्यासक्रम उद्योगधुरिण, विख्यात शिक्षणतज्ज्ञ व मेन्टॉर्स, करिअर मार्गदर्शक, एंजल इनव्हेस्टर्स या सगळ्यांना एकाच व्यासपीठावर आणेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com