राज्यभरात 13 लाख क्विंटलहून अधिक तूर खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मुंबई - राज्यात एक फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरवात झाली आहे. आजपर्यंत 167 तूर केंद्रावर एक लाख 16 हजार 245 शेतकऱ्यांची 13 लाख 99 हजार 151 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.

तूर खरेदीचा काळ तीन महिने असून, आतापर्यंत 4 लाख 3 हजार 376 शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. सध्या कार्यरत खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही पणनमंत्री देशमुख यांनी सांगितले. 

Web Title: Purchase more than 13 lakh quintals of tur across the state

टॅग्स