राज्यात सर्वदूर पाऊस

राज्यात सर्वदूर पाऊस

पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे सर्वाधिक २८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारपर्यंत (ता. २०) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

राज्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांतील काही भागात सकाळी हलक्या सरी बरसल्या. पूर्व विदर्भातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम विदर्भातील काही भागात हलक्या सरी, तर अनेक भागात ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील नगरमधील अकोले, नाशिकमधील इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील काही भागात हलका पाऊस पडला. कोकणातही पावसाच्या सरी बरसत होत्या.  

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. अंबोली येथे सर्वाधिक  २४८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच घाटमाध्यावरही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांतील काही भागात हलका पाऊस पडला असून अनेक भागात ढगाळ हवामान होते. महाबळेश्वर येथे १४०. ८ मिलिमीटर तर लामज येथे १२२ मिलिमीटर पाऊस पडला. दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. कोल्हापुरातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

मराठवाड्यात दमदार
अडीच महिने पावसाचा खंड असलेल्या बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेली लावली. उस्मानाबादमधील मंगळूर येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर तुळजापूर ६७, सालगारा ६२, सावरगाव ९७, इतकल १२५ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे खरिपातील पिकांना चांगलाच दिलासा मिळाला. गुरुवारी सकाळपासून मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली होती.   

विदर्भात सर्वदूर पाऊस हजेरी
विदर्भातील परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक भागात सर्वदूर पाऊस पडला. विदर्भाच्या पूर्व भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून घरांचीही पडझड झाली आहे. गडचिरोलीतील पेरमिली येथे सर्वाधिक पाऊस पडला. त्यापाठोपाठ आहेरी येथे २४६, जिमलगट्टा २२८, अल्लापाल्ली २२०, सिरोंचा ११९, बामणी १०७, मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहे.

राज्यात गुरुवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस - मिलिमीटरमध्ये 
कोकण विभाग -  नयाहडी ३६, करनाळा ३९, चौक ३९, महाड ३४, बिरवडी ४६, करंजवडी ४१, नाटे ३९, खारवली ४०, तुडली ३१, कोंडवी ३१, मरगतम्हाणे ३६,  रामपूर ३०, शिरगांव ४६, खेड ३०, शिरशी ३६, कुलवंडी ३२, धामनंद ४८, अबलोली ५०, मंडणगड ३२, देव्हरे ३४, टरवल ४३, अंगवली ४०, कोडगाव ३२, देवरुख ३४, तुलसानी ४९, माभले ३२, सवंडल ४३, भांबेड ३७, शिरगाव ५८, पाटगाव ५२, बापरडे ५५, मासुरी ३३, श्रावण ४५, सावंतवाडी ३८, आजगाव ३२, अंबोली २४८, कनकवली ६३, फोंडा ५२.८, सांगवे ८२, नांदगाव ५७, तालेरे ४२, वागडे ६५, कसाल ५०, मानगाव ४४, वैभववाडी ३२, भुइबावडा ४०, भेडशी ५८ तलवड ३३.

मध्य महाराष्ट्र - इगतपुरी ३४, जामखेड ३०, खर्डा ६१ नाणज ३७, नायगाव २९, मुठे ४६, निगुडघर ३०, काले ३४, कार्ला ३८, लोणावळा ७८, राजूर ६९, आपटाळे ४८, शेळगी ३०,  सोलापूर ५५.९, होटगी ३६, बार्शी ६०, वैराग ६१, उपळाई ३५, गौडगाव ५८, पांगरी ५४, पानगाव ५६, नारी ५७, सुर्डी ५६, खांडवी ४७, अक्कलकोट ३५, दुधनी ४१, वागदरी ३८, किणी ३०, सावळेश्‍वर ३५, हेळवाक ६१, मरळी ३३, महाबळेश्‍वर १४०.८, तापोळा ९८, लामज १२२,करंजफेन ६६, आंबा ८१, राधानगरी ४०, गगनबावडा ४५, साळवण ४४, गवसे ४०, चंदगड ६२, हेरे ५९.

मराठवाडा - मंथा ३८, ढोकसळ३३, पांगरी ३०, म्हाळसजावळा ३९, पिंपळनेर ३०, चौसाळा ३४, नेकनूर ४६, लिंबागणेश ३९, पाटोदा ३३, दसखेड ४५, अमळनेर ३९, जातेगाव ३१, केज ४२, युसूफ ३७, हनुमंत ३६, होळ ३७, विडा ३४, बनसारोळा ३०, नागापूर ४०, धारूर ३२, मुरूड ५७, लामजना ३७, भादा ३७, किल्लारी ३६, हडोळती ३१, कासार बालकुंड ३२, मदनसुरी ४१, कासारशिर्सी ५१, नागलगाव ४०, वाढवणा ३८, नळगिर ५२, पोहरगाव ३२, जळकोट ५०, घोणशी ६२, उस्मानाबाद शहर ५७, उस्मानाबाद ग्रामीण ३५, बेंबळी ३५, पडोली ६३, कासेगाव ५०, तेर ४६, तुळजापूर ६७, सालगारा ६२, सावरगाव ९७, मंगरूळ १५०, इतकल १२५, जळकोट ४५, नळदुर्ग ८ जवळा ४३, आंभी ३४, माणकेश्‍वर ५५, भूम ६७, लेत ४३, कळंब ४, इतकूर ३३, येरमाळा ४६, मोहा ४०, शिरढोण ४५,
 गोविंदपूर ४५, उमरगा ४१, डाळिंब ८१, नारंगवाडी ४२, मुरूम ४६, लोहारा ६०, माकणी ४५, जेवळी ६२, वाशी ३३, पारगाव ३२, तेरखडा ४२, सगरोळी ३२, मुक्रमाबाद ४१, माळाकोळी ४७, हदगाव ४२, तळणी ३३, निवघा ३८, तामसा ३९, पिंपरखेड ३९, आष्टी ६१, भोकर ३०, मोघाळी ३०, मातूळ ८०, किनी ६१, किनवट ६७, बोधडी ४२, इस्लापूर ५२, जलधारा ३४, शिवणी ३५, मांडवी ७१, दहेली ५४, हिमायतनगर ५८, जवळगाव ७०, सरसम ७८, माहूर ७२, वानोळा ५६, वाई ६१, सिंदखेड ५९, धर्माबाद ३७, गोळेगाव ३०, सिंधी ४३

विदर्भ - सांगवी म्हाळसा ५९, हियातनगर ५६,  औंढा ६२, येहळेगाव (तूकाराम) ५६, साखरा ६०,  हत्ता ४०, वाकद ५८, कळगाव ५५, तूप ५०, अंजनखेड ५१, माणिकवाडा ५१, पुसद ५६, उमरखेड ५८, महागाव ६७, गुंज ५८, कळी ५३, वणी १०५, राजूर ५६, शिंदोळा ५३, बोटोनी ५०, मुकुटबन ५५, घाटंजी ५३, पारवा ५५, आमदी ५३, खाट ५३.६, धानळा ५२.८, कोडामेंडी ५३.८, उमरेड ७१.२, बेला ५६.२, भिवापूर ६०, कारेगाव ७१, मोहाडी ९८, वार्थी ५७, केंद्री ६८, कान्हाळगाव ८५, आंधळगाव ७०, तुमसर ६९, मिटेवणी ६२, अड्याळ ६५, कोंढा ५६, पवनी ८९, चिंचळ ८०, असगाव ६७, 
आमगाव ५० साकोली ६४, आकोडी ६६, सांगडी ५२, लाखंदूर ११४, बारव्हा १२५, मासाळ ९९, लाखनी ८०, पोहारा ७४, पालंदूर ५६, पिंपळगाव ५७, रत्नारा ७१,  रावणवाडी ७३, गोंदिया ५८, खामरी ५८, कामठा ७०, काट्टीपूर ७३, तिरोडा ६८ , देवरी ९६, चिंचगड ५६, बोधगाव देवी ७७, अर्जुनी ८४, महागाव ७६, केशोरी ६५, सौदाद ९०, दारव्हा ७०, सडक अर्जुनी १२९, घुगस ५८, मूल ७०, बेंबळ ५०, वरोरा ६६, भद्रावती ११७, नांदोरी ७५, मुधोळी ५०, मांगळी ६५, धोडपेठ ७३, चिमूर ७४,  बह्मपूरी ९७, अन्हेर ७२, मेंढा ६९, मिढाळा ७५, नावरगाव ७०, शिंदेवाही ६६, मोहाली ५८, कोपर्णा १०८, गडचांदूर ८०, सावळी ६०, पाथरी ६०, विहाड ६०, बल्लारपूर ८०, जेवती ५९, पाटण ६४, गडचिरोली ५०, ब्राह्मणी ९०, पिसेवढथा ५६, वैरागड ६०, चामोर्शी ९१, कुंघाडा ६७, आष्टी ९०, येनापूर ६१,
 सिरोंचा ११९, बामणी १०७, आहेरी २४६, जिमलगट्टा २२८, अल्लापाल्ली २२०, पेरमिली २८६,  जरवंडी ५०, मुरूमगाव ७३, चाटेगाव ५३, पेंढरी ६८, देसाईगंज ६४, वडसा ६६, शंकरपूर ७६, मुलचेरा ७६, भामरागड १३०.

शेतकरी सुखावला
अनेक ठिकाणी गुरुवारी दिवसभर पाऊस
दुष्काळी भागातील नदी, नाले दुथडी वाहिले
राज्यात सर्वत्र पावसाने शेतकरी सुखावला
पावसामुळे खरिप पिकांना दिलासा
पेरमिलीत २८६ मिलिमीटर पावसाची नोंद
अंबोली येथे २४८ मिलिमीटर पाऊस
गोंदीया जिल्ह्यातील सावली, डोंगरगाव येथे वादळी पावसाने घरांचे नुकसान


आजही जोरदार पावसाची शक्यता 
महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि गुजरातचा दक्षिण भाग या दरम्यान समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्रावार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. आज, शुक्रवारी (ता. १८) पश्चिम विदर्भ, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर तुरळक ठिकाणी पावासाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com