सेनेला सत्तेवरुन खाली खेचल्याचा राऊतांना आनंद, नारायण राणेंचा प्रहार

सेनेला सत्तेवरुन खाली खेचल्याचा राऊतांना आनंद, नारायण राणेंचा प्रहार

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मविआ सरकार बरखास्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचल्याचा आनंद संजय राऊत यांना झाला. अशा खोचक दावा ट्विट करत केला आहे.

संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने. असे राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे, मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत आदरणीय पवार साहेब यांचं स्वप्न पूर्ण ...शिवसेना संपली ... ? असे म्हटले आहे.

दोघांचे ट्विट पाहता राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

यापूर्वीही भाजपच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे. असे वक्तव्य केलं होतं.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. शिवसेनेने भाजपासोबत सरकार बनवावं, मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे.आज दुपारी शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असून आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा त्यांनी केला आहे. त्याच्याकडे ४० आमदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com