केवळ गुन्ह्याची नोंद असल्यास शस्त्र परवाना नाकारणे अयोग्य

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

मुंबई - केवळ गुन्हा नोंदवण्यात आल्याच्या कारणाखाली एखाद्या व्यक्तीला शस्त्र परवाना नाकारता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. या प्रकरणी पुण्यातील शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्या अर्जावर फेरविचार करून निर्णय घेण्याचा आदेश न्यायालयाने पुणे पोलिस आयुक्तांना दिला.

एखाद्या नागरिकाविरोधात लेखी तक्रारी दाखल झाल्या असल्या; तरी त्यामुळे शस्त्र परवान्याचे नूतनीकरण रोखता येणार नाही, असे मत न्या. नरेश पाटील आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. पुण्यात नगरसेवक असताना भोसले यांनी स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्यासाठी परवाना मागितला होता. तेव्हापासून 2009 पर्यंत वेळोवेळी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांचा परवाना रद्द केला.

या निर्णयाला भोसले यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. हत्यारे कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी धोका असेल; तर त्याला शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद भोसले यांचे वकील एस. बी. शेट्ये यांनी केला. खंडपीठाने हा युक्तिवाद मान्य केला आणि भोसले यांच्या अर्जावर दोन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश पुण्याच्या पोलिस आयुक्तांना दिला. 

महाराष्ट्र

सांगली - नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाकडून (एनएचबी) मिळणाऱ्या हरितगृह अनुदानासाठी गुजरात, मध्य प्रदेश ही राज्ये आणि विदर्भाचा अपवाद...

04.18 AM

मुंबई - श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला....

04.03 AM

मुंबई - सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष...

03.36 AM