रस्ते अपघातात 12 हजार जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मुंबई - राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्‍चित करण्यात आली आहेत. रस्त्यावरील वाढते अपघाती मृत्यू ही चिंताजनक बाब असून, गेल्या वर्षात एकूण 35 हजार 853 अपघात झाले. एकूण 12 हजार 264 व्यक्ती रस्ते अपघातात मृत्युमुखी पडल्या, तर 32 हजार 128 जण गंभीर जखमी झाले. देशपातळीवर अपघाती मृत्यू या निकषावर राज्याचा तिसरा क्रमांक लागतो.

अपघात झालेल्यांमध्ये 25 ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्तीची संख्या मोठी असल्याचे आढळले आहे. राज्यातील अपघातग्रस्त ठिकाणावर सुधारात्मक उपाययोजना सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी देशातील पहिले स्वयंचलित चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यात 35 परिवहन कार्यालयात ब्रेक तपासणी चाचणीची सुविधा उभारण्यात आली आहे. राज्यात अपघातोत्तर वैद्यकीय सुविधा पुरविण्यास्तव एकूण 108 ट्रॉमा केअर केंद्र कार्यरत आहेत. तसेच 108 क्रमांकाच्या एकूण 937 रुग्णवाहिका 24 तास कार्यरत आहेत. रस्ता सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दिलेल्या सर्व निर्देशांची पूर्तता करण्यात आली आहे.

राज्यातील रस्त्यांवरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने रस्ता सुरक्षेची मोहीम हाती घेतली आहे. 23 एप्रिल ते 7 मे या पंधरवड्यादरम्यान ही मोहीम चालणार आहे.

राज्यात मार्च अखेरपर्यंत...
3 लाख 28 हजार
नोंदणीकृत वाहने
3 लाख 40 हजार
परवानाधारक वाहनचालक
राज्यातून प्रवास करणाऱ्या आणि राज्याबाहेरील
वाहनांची मोठी संख्या हे एक मोठे आव्हान आहे.

Web Title: road accident 12000 people death