विमानतळ विस्तारासाठी सहारमधील पायवाट बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - विमानतळाचा विस्तार आणि सुशोभीकरणासाठी जीव्हीके कंपनीने पोलिसांच्या मदतीने अंधेरीतील सहार येथील सुतारपाखाडीमधील रहिवाशांची पायवाट मंगळवारपासून (ता.16) बंद केली. दरम्यान, विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

ही पायवाट एमएमआरडीए, जीव्हीके कंपनी आणि पोलिसांनी बंद केली. त्यामुळे स्थानिकांना येण्या-जाण्यासाठी काही किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे. फेब्रुवारीत पायवाट बंद करण्याचा प्रयत्न जीव्हीकेने केला होता; मात्र ग्रामस्थांनी विरोध करत अधिकारी-कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले होते. या प्रकरणी स्थानिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शंभर वर्षांपूर्वीची ही पायवाट तातडीने रहिवाशांसाठी खुली करावी, या मागणीसाठी रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.