राज्यात रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष 

प्रशांत बारसिंग 
सोमवार, 30 जुलै 2018

मुंबई - सुरक्षेसाठी केलेल्या नियमांकडे चालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या सव्वा वर्षात राज्यात तब्बल 15 हजार 625 लोकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याच्या वस्तुस्थितीवर दुर्दैवाने शिक्‍कामोर्तब झाले आहे. 

राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने 14 ऑक्‍टोबर 2015 रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते सुरक्षा धोरण जाहीर केले आहे. यामध्ये अपघातातील विविध मुद्यांवर संबंधित विभागांनी करावयाच्या उपाययोजना आणि निर्देश यांचा समावेश आहे. तसेच या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मार्च 2015 मध्ये समिती स्थापन केली. या धोरणांनुसार राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि अन्य रस्त्यांवरील 1324 ठिकाणे अपघात प्रवण क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली असून आरटीओकडून वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येते. यासाठी अशासकीय संस्था, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व परिवहन विभाग कार्यरत आहेत. रस्त्यांवर आवश्‍यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, पांढरे पेट्टे आणि सूचना फलक लावण्यात आले आहेत, असे असताना अनेक चालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे अपघातांच्या संख्येवरून स्पष्ट होते. 

राज्यातील रस्ते अपघात प्रामुख्याने अतिवेग, घाटातील वळणांवरील कमी वेग पर्यादा आणि ओव्हरटेकिंगमुळे होत असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालात म्हटले आहे. राज्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे अहवाल सांगतो. रस्ते अपघातात तमिळनाडूचा प्रथम क्रमांक असून, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. 

Web Title: Road safety ignored in state