पुण्यात 'सकाळ' निर्विवाद अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

असे झाले सर्वेक्षण... 
द रीडरशिप स्टडीज कौन्सिल ऑफ इंडिया (आरएससीआय) आणि मीडिया रिसर्च यूजर्स कौन्सिल (एमआययूसी) या संस्थांनी एकत्रितपणे भारतीय वर्तमानपत्रांच्या वाचकसंख्येचे सर्वेक्षण केले. त्यासाठी तब्बल ३,९९,९७३ लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ३,१९,६१८ मुलाखतींचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यासाठी शहरी भागातील २.१४ लाख आणि ग्रामीण भागातील १.१६ लाख घरांना संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. देशभरातील २८ राज्यांमध्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या पाच लाखांहून अधिक लोकसंख्येच्या ९५ शहरांमध्ये आणि ९१ जिल्ह्यांमध्ये आणि १०१ जिल्हा-गटांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. 

'आयआरएस'चे सर्वेक्षण जाहीर : 'एबीसी'नुसार खपामध्येही राज्यात 'सकाळ' नंबर वन! 
वृत्तपत्र वाचकांच्या संख्येत तब्बल ४० टक्क्यांनी अभूतपूर्व वाढ झाल्याचा निष्कर्ष नुकत्याच जाहीर झालेल्या इंडियन रीडरशिप सर्व्हेमधून (आयआरएस) समोर आला आहे. भारतीय वृत्तपत्रसृष्टीचे आश्वासक भविष्य या सर्वेक्षणाने मांडले आहे. महाराष्ट्रात विधायक आणि लोकांना बरोबर घेऊन चालण्याच्या पत्रकारितेची परंपरा रुजविणाऱ्या 'सकाळ'ने भारतातील सर्वोत्तम वीस वृत्तपत्रांच्या आणि भाषिक वृत्तपत्रांमध्ये सर्वोत्तम दहा वृत्तपत्रांच्या यादीत स्थान पटकाविले आहे. 'सकाळ'च्या वाचक परिवारात तब्बल एक कोटीहून अधिक मराठी वाचक सहभागी असल्याचा निष्कर्ष 'आयआरएस'ने काढला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि नव्या युगातील 'आयटी'ची राजधानी पुणे येथे 'सकाळ'ने आपले स्थान अबाधित राखले आहे. याआधी 'ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन'च्या (एबीसी) वृत्तपत्रांच्या प्रत्यक्ष खपाच्या आकडेवारीतही 'सकाळ'ने जानेवारी २०१७ ते जून २०१७ या काळात १,२७९,९४३ खपासह राज्यातील पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र हा मान वाचकांच्या बळावर संपादित केला आहे. आता वाचकसंख्येतही 'सकाळ'ने कोटीचा टप्पा पार केला आहे. 

भारतीय वृत्तपत्रसृष्टीमध्ये भाषिक वृत्तपत्रांचा दबदबा आहे, यावर 'आयआरएस' सर्वेक्षणाने मोहोर उमटवली आहे. या आधी २०१४ मध्ये वाचकसंख्येचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्या वेळी २९.५ कोटी भारतीय वृत्तपत्र वाचत होते. ती संख्या २०१७ च्या सर्वेक्षणात तब्बल ११ कोटींनी वाढली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार तब्बल ४०.५ कोटी भारतीय वर्तमानपत्रे वाचत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वाढ तब्बल ४० टक्के आहे. बारा वर्षे वयावरील ३९ टक्के भारतीय वर्तमानपत्रांचे वाचक आहेत. भारतीय शहरांमध्ये ५३ टक्के लोक वृत्तपत्र वाचतात; तर ग्रामीण भागामध्ये वृत्तपत्रांची वाचकसंख्या ३१ टक्के आहे. 

'सकाळ' परिवारातील साप्ताहिक सकाळ आणि तनिष्का या दोन नियतकालिकांनी (मॅगझिन्स) सर्वोत्तम वाचकसंख्येच्या पहिल्या पाच नियतकालिकांमध्ये स्थान मिळविले आहे. वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या कोणत्याही स्पर्धक वृत्तपत्र समूहांची नियतकालिके सर्वाधिक वाचकसंख्येच्या यादीत समाविष्ट नाहीत, असे 'आयआरएस'ने प्रकाशित केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. 'सकाळ' परिवारातील दोन्ही नियतकालिकांची वाचकसंख्या एकत्रितरीत्या तब्बल ८,२४,००० असून, ही वाचकसंख्या मराठी नियतकालिकांमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. 

तब्बल साडेआठ दशकांहून अधिक काळ पुणेकरांचे हक्काचे वर्तमानपत्र असलेल्या 'सकाळ'ने वाचकांच्या पाठबळावर ताज्या 'आयआरएस' सर्वेक्षणातही आपले स्थान भक्कम केले आहे. तब्बल ११ लाख ४३ हजार वाचकसंख्येसह पुणेकरांची पहिली पसंती 'सकाळ'च असल्याचे सिद्ध झाले आहे. पुण्यातील 'सकाळ'चा वाचक अन्य कोणत्याही स्पर्धकांपेक्षा अधिक सुजाण असल्याचे 'आयआरएस' सर्वेक्षणातून पुढे आले आहे. वाचकांच्या सामाजिक-आर्थिक दर्जानुसार होणाऱ्या वर्गवारीत (National Consumer Classification System - NCCS) 'सकाळ'चे पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ३६ टक्के वाचक अतिउच्च दर्जा आणि उच्च दर्जा या श्रेणीतील असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. वाचकांची सामाजिक-आर्थिक वर्गवारी कोणत्याही सेवा अथवा उत्पादने यांच्या जाहिरातींसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. यापूर्वी २०१४ मध्ये वाचकसंख्या सर्वेक्षण जाहीर झाले होते. त्यानंतरची तीन वर्षे अशा स्वरूपाचे सर्वेक्षण झालेले नव्हते. मात्र, यापुढे दर तीन महिन्यांनी अशा स्वरूपाचे व्यापक सर्वेक्षण होणार आहे. 

असे झाले सर्वेक्षण... 
द रीडरशिप स्टडीज कौन्सिल ऑफ इंडिया (आरएससीआय) आणि मीडिया रिसर्च यूजर्स कौन्सिल (एमआययूसी) या संस्थांनी एकत्रितपणे भारतीय वर्तमानपत्रांच्या वाचकसंख्येचे सर्वेक्षण केले. त्यासाठी तब्बल ३,९९,९७३ लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ३,१९,६१८ मुलाखतींचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यासाठी शहरी भागातील २.१४ लाख आणि ग्रामीण भागातील १.१६ लाख घरांना संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. देशभरातील २८ राज्यांमध्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या पाच लाखांहून अधिक लोकसंख्येच्या ९५ शहरांमध्ये आणि ९१ जिल्ह्यांमध्ये आणि १०१ जिल्हा-गटांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. 

पुणे म्हणजे 'सकाळ' 
११, ४३, ००० वाचकसंख्या 

एनसीसीएस ए १ एनसीसीएस ए २ 
पुणे 
सकाळ १४% २२% 
लोकमत ७% १७% 

महाराष्ट्र 
सकाळ ९% १७% 
लोकमत ५% १४% 

शहरी महाराष्ट्र 
सकाळ १६% २६% 
लोकमत ८% १९% 

सामाजिक-आर्थिक दर्जानुसार वाचकांची वर्गवारी (National Consumer Classification System - NCCS) 
एनसीसीएस ए 1 : अतिउच्च दर्जा 
एनसीसीएस ए 2 : उच्च दर्जा

Web Title: Sakal newspaper number one in Indian Readership survey