'सकाळ साप्ताहिक'ला का. र. मित्र उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

दिवाळी अंकांना 107 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. मराठी भाषेची ही परंपरा जोपासण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दर्जेदार दिवाळी अंकांना उत्तेजन मिळावे, नव्या दमाच्या आणि ताकदीने लेखन करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन मिळावे, ही यामागची भूमिका आहे.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप

"मसाप'चे पुरस्कार जाहीर; "अंतर्नाद', "झपूर्झा', "किशोर', "डिजिटल'ची निवड

पुणे- महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र असलेल्या "सकाळ'च्या "सकाळ साप्ताहिक' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा यंदाचा "का. र. मित्र उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार' जाहीर झाला. "सकाळ साप्ताहिक'बरोबरच "अंतर्नाद', "चतुरंग अन्वय', "झपूर्झा', "किशोर', "डिजिटल (ऑनलाइन)' या अंकांचीही विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि ग्रंथालय विभागाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी सोमवारी या पुरस्कारांची घोषणा केली. उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृती "रत्नाकर पारितोषिक' अंतर्नाद या दिवाळी अंकाला, "विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक' कोकण मराठी साहित्य परिषदेच्या झपूर्झा या अंकाला, "शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' चतुरंग अन्वय या अंकाला, जानकीबाई केळकर स्मृती उत्कृष्ट बालवाङ्‌मयाचे पारितोषिक किशोर या अंकाला जाहीर झाले. याबरोबर, डेलीहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाइन दिवाळी अंकाचे पारितोषिक डिजिटल या अंकाला देण्यात येणार आहे.

दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे "दि. अ. सोनटक्के पारितोषिक' उद्याचा मराठवाडा या अंकातील लक्ष्मीकांत देशमुख यांच्या "बाटगी विहीर' या कथेला, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे "अनंत काणेकर पारितोषिक' पुणे पोस्ट या दिवाळी अंकातील वसंत आबाजी डहाके यांच्या "अर्धनारीश्वर' या लेखाला जाहीर झाले आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 150 हून अधिक दिवाळी अंक आले होते, त्यांतून या अंकांची निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय सोलंकर, अनिल गुंजाळ यांनी काम पाहिले. पुरस्कार वितरण ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 20) सायंकाळी साडेसहा वाजता परिषदेच्या सभागृहात होणार आहे.

महाराष्ट्र

मुंबई - 'खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणून निकष लावण्यात आले आहेत....

05.54 AM

मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या...

05.21 AM

राज्य सरकारकडून निधीसाठी सातत्याने पाठपुरावा मुंबई - एड्‌स आणि गुप्तरोग...

05.06 AM