'लक्षात आहे ना?', शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर मनसेची पोस्ट

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली
Raj Thackeray News | MNS Post to Shiv Sena
Raj Thackeray News | MNS Post to Shiv SenaSakal

विधान परिषद (Maharashtra Vidhan Parishad) निकालानंतर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालापासून नॉट रिचेबल आहे. इतकेच नव्हे तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असलाचा दावादेखील करण्यात आला आहे. तसेच, शिंदेसह सेनेचे इतरही आमदार नॉट रिचेबल आहेत. अशातच मनसेचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये सत्ता येत असते जात असते असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लक्षात 'आहे ना?' असे ट्विट केले आहे. आणि राज ठाकरे यांच्या पत्रातील शेवटचा मजकुराचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये, राज्य सरकारला माझं एकच सांगण आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणही सत्तेचा ताम्रपाट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही! असे पत्रामध्ये म्हटले आहे.

या पत्राच्या अखेरी राज ठाकरे यांची सही देखील आहे.

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक आमदार संपर्कात नाहीत. ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता शिवसेनेचे तीन मंत्रीसुद्धा नॉट रिचेबल आहे. शंभुराजे देसाई, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे यांच्याशीही कोणताही संपर्क होत नाहीये.

विधानपरिषद निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री १२.३० वाजता वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीसाठी शिवसेनेचे १३ आमदार गैरहजर होते.

पक्षाकडून या आमदारांना वारंवार संपर्क करण्यात येत होता. त्यानंतर आज सकाळी पुन्हा आमदारांना बोलावणं धाडलं आहे. या बैठकीला तरी आमदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असण्याने शिवसेनेतील अंतर्गंत कलह चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com