sarkarnama.in : विशेष बातम्या

sarkarnama
गुरुवार, 27 एप्रिल 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

कार्यालयासाठी जागा शोधतेय काँग्रेस
मेट्रोकडून मंत्रालयासमोरील परिसरात असलेल्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस मुख्यालयासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस,समाजवादी पक्ष यांना पक्ष कार्यालये मोकळे करून देण्याच्या वारंवार लेखी सूचना देवून मेट्रोकडून पाठपुरावाही करण्यात येत होता. तथापि आधी पर्यायी जागा देवून आमचे पुनर्वसन करा आणि मगच आमची कार्यालये खाली करा असा हेका राजकीय व राष्ट्रीय पक्षांकडून चालविण्यात येत असल्याने मेट्रोच्या प्रकल्पाला विलंब  होत होता.
पूर्ण बातमी इथे वाचा

सरकारकडून तूरउत्पादक आरोपीच्या पिंजऱ्यात
 सध्याचे सरकार शेतकऱ्यांबाबत निर्णय घेत नाही. घेतला तर त्यात गफलत जरूर करते. आज काढलेल्या निर्णयातही अशीच गफलत असून पंचनाम्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आवश्‍यक आहेत. सात बारा उताऱ्यावर नोंद सक्तीची आहे. त्यात कालापव्यय होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय तूरखरेदी नंतर सर्वाधिक तूर विक्री केलेल्या एक हजार शेतकऱ्यांची यादी केली जाईल. त्यांना संशयित म्हणून त्यांची चौकशी होईल. त्यात त्यांनी ते निर्दोष आढळल्यावर पैसे अदा होतील. त्यामुळे तूर उत्पादकांना पुन्हा आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

खासदार व ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन
सुप्रसिद्ध अभिनेते व भाजपचे खासदार विनोद खन्ना यांचं आज मुंबईतील गिरगाव भागातील एका रुग्णालयात निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. विनोद खन्ना हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतरही त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म पेशावर (पाकिस्तान) मध्ये 6ऑक्‍टोबर 1946 मध्ये झाला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी कविता खन्ना, पुत्र राहुल, अक्षय आणि दोन मुली असा परिवार आहे. "मनके मित' या सुनील दत्त यांच्या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
पूर्ण बातमी इथे वाचा

आ. मेधा कुलकर्णींवर संभाजी ब्रिगेडची टीका
संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा नव्याने उभारण्याचा विषय दिवसेंदिवस वादग्रस्त बनत चालला आहे. यासंबंधी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून घेतली जाणारी भूमिका जातीयवादी आणि गडकरींविषयीच्या अज्ञानापोटी असल्याची टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

मंत्र्यांनी मंजूर केलेले बंधारे सचिवांनी अडविले
जलसंधारणाची कामे दोन महिन्यांत पूर्ण करा, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण खुद्द सरकार दरबारी जलसंधारण खात्यात मंत्री व प्रधान सचिव यांच्यातच ताळमेळ नसल्याने कामांना कोलदांडा बसला आहे. नदी पुर्नज्जीवन योजनेअंतर्गत जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी मंजूर केलेले जवळपास 100 कोटीचे बंधारे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी अडविले आहेत. 
पूर्ण बातमी इथे वाचा

सरकारनामा ट्विटर

 

टॅग्स