sarkarnama.in : विशेष बातम्या

Sarkarnama
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

नवा जीआर - राज्यातील 137 अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य शासनाने आज काढलेल्या आदेशानुसार 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस, राज्य पोलिस सेवा, तसेच भारतीय पोलिस सेवेतील विशेष पोलिस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या शासनाने केल्या आहेत.
पूर्ण बातमी इथे वाचा

सभापती रामराजेंवर षड्‌यंत्राचा आरोप
खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर षड्‌यंत्र रचून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची चौकशी करावी, या मागणीसाठी उदयनराजे समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 
पूर्ण बातमी इथे वाचा

मध्यावधी लावूनच बघा : पृथ्वीराज चव्हाण 
संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, प्रसंगी तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत मध्यावधी निवडणुका लावणार असाल, तर लावूनच बघा, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारला दिला. 
पूर्ण बातमी इथे वाचा

मुंबईत हताश कॉंग्रेसला नवसंजीवनीची प्रतीक्षा !
लोकसभा, विधानसभा निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला सातत्याने पराभव पहायला लागला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्र लढूनही कॉंग्रेसची पराभवाने पाठ सोडली नाही.
पूर्ण बातमी इथे वाचा

महसूलात नाथाभाऊंपेक्षा दादाच बरे, अधिकार्‍यांची भावना
राज्य सरकारमधील महसूल विभागातील काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना काम करण्याचे स्वातंत्र्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यामुळे मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दादांवर कमालीचे खुश असल्याचे पहावयास मिळते.
पूर्ण बातमी इथे वाचा

"संघर्ष यात्रे' मुळे भाजपला संवाद यात्रेची आठवण : धनंजय मुंडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून राज्यात शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. सरकारने आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा मग शेतकऱ्यांना भेटायला जावे असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. 
पूर्ण बातमी इथे वाचा

 

सरकारनामा ट्विटर

 

टॅग्स