sarkarnama.in : विशेष बातम्या

Sarkarnama
शुक्रवार, 5 मे 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

सदाभाऊंचे "टार्गेट' शेट्टीच ! भडास काढली ! 
"एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत' याचा अनुभव या दोघांच्या बाबतीत येत आहे. दोघेही आक्रमक, गावरान भाषा आणि शेतकरी प्रेमाने भारावून गेलेले. पण श्री. खोत यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दोघांत अंतर निर्माण झाले आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

नारायण राणे हा 'नॅशनल इश्‍यू' आहे?
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाविषयी एकदोन महिने झाले चर्चा सुरू आहे. तरीही ते भाजपमध्ये न जाता स्वपक्षातच आहेत. ते भाजपमध्ये गेले काय किंवा नाही गेले काय, त्याने महाराष्ट्राची न भरून येणारी हानी होणार आहे की काय? की राणेंचा भाजप प्रवेश हा 'नॅशनल इश्‍यू' आहे हे एकदा माध्यमांनी जाहीर करावे. राणे यांनी राजकारणात जी काही म्हणून वर्षे खर्ची केली आहेत त्यापैकी निम्याहून अधिक वर्षे ते शिवसेनेत होते. 
पूर्ण बातमी इथे वाचा

रेल्वे विस्तारीकरणाच्या विरोधात लातूरमध्ये बंद
लातूरकरांच्या विरोधात काल उदगीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तर आज (ता.5) लातूर- मुंबई एक्‍स्प्रेसचा बिदरपर्यंत विस्तार करून हक्काची गाडी पळवल्याच्या निषेधार्थ लातुरात बंद पाळण्यात आला.
पूर्ण बातमी इथे वाचा

पाटण्यातल्या भाकड गाई  भाजप कार्यालयात बांधा  - लालूप्रसाद यादव
भाजपकडून सतत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे संतापलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी गाईंचा आधार घेतला आहे. म्हाताऱ्या आणि भाकड गाई भाजपच्या कार्यालयात नेऊन बांधा, असे आवाहन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

बापट, फुंडकर यांना ऑस्ट्रेलियातून परत बोलवा - पृथ्वीराज चव्हाण
अतिरिक्त तुरीच्या उत्पादनामुळे महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्याला अडचणीत लोटून पुरवठामंत्री गिरीश बापट आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांनी परदेश दौऱ्यावर जाणे योग्य नसल्याने या दोघांनाही तातडीन मायदेशी परत बोलवा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

सरकारनामा ट्विटर

 

टॅग्स