sarkarnama.in : विशेष बातम्या

Sarkarnama
शनिवार, 6 मे 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

रामदास कदम यांच्या बंगल्यावरून दहा लाखांच्या खंडणीचा फोन ?
आपल्या बेताल वक्‍तव्यावरून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम आता एका नव्या वादात सापडले आहेत. काल (शुक्रवारी) त्यांच्या "शिवगीरी' या बंगल्यातून वाळू उपसा ठेकेदाराला थेट दहा लाखांच्या खंडणीचा फोन गेल्याचे प्रकरण समोर आले आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

ऊर्जामंत्र्यांच्या जनता दरबारामुळे अधिकाऱ्यांची झोप उडाली
राज्याचे ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यात त्यांनी सुरू केलेल्या जनता दरबारामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या थेट भेट अभियानात शेतकऱ्यांना व अन्य वीज ग्राहकांना थेट तक्रारी मांडता येणे शक्‍य झाल्यामुळे ऊर्जा विभागाच्या समस्यांचा पंचनामा थेट मंत्र्यांसमोर होवू लागल्याने अधिकारी अडचणीत येवू लागले आहेत.
पूर्ण बातमी इथे वाचा

महिलांनी उगारली कुपोषणावर बंदूक
कुपोषणावर मात करण्यासाठी केवळ सरकारनेच सगळे केले पाहिजे, असे नाही. उलट समाजाने पुढाकार घेतला तर अशा सामाजिक समस्या लवकर दूर होऊ शकतात, याचा आदर्श घालून दिला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील काही महिलांनी. या महिलांनी चक्क आपल्या भागातली सहा कुपोषित मुलेच दत्तक घेतली आहेत.
पूर्ण बातमी इथे वाचा

पवारांचे टायमिंग... "पुस्तकांच्या गावा'तील कमळ कोमेजले ! 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त भिलारमधील रस्त्यांच्या दुतर्फा कमळाचे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे वातावरण भाजपमय झाले होते. पण दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिलार सदिच्छा भेट दिली आणि कमळाचे झेंडे गायब होऊन त्या जागी राष्ट्रवादीचे घडाळ्याचे झेंडे आले ! झेंड्यातील हा बदल पर्यटकांना अचंबित करून गेला. 
पूर्ण बातमी इथे वाचा

कचरा आंदोलकांना राष्ट्रवादीच्या खासदारांची फूस - राज्यमंत्री शिवतारे
गेल्या 21 दिवसांपासून कचरा डेपो हटविण्यासाठी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलकांना "राष्ट्रवादी'च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण या दोन्ही खासदारांची फूस असल्याचा आरोप जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी केला.
पूर्ण बातमी इथे वाचा

सरकारनामा ट्विटर

 

Web Title: Sarkarnama news bulletin

टॅग्स