तडवळ्याच्या पाटणकरांना राष्ट्रपतिपदक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सातारा - मूळचे तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथील रहिवाशी व सध्या नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे. तडवळेसह कोरेगाव तालुक्‍यात त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा - मूळचे तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथील रहिवाशी व सध्या नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे. तडवळेसह कोरेगाव तालुक्‍यात त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री. पाटणकर यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण तडवळे संमत कोरेगाव, तर महाविद्यालयीन शिक्षण कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयात झाले. पुढील शिक्षण पुण्यात झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेतून १९८४ मध्ये श्री. पाटणकर यांची पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली. नंदुरबार, अहेरी व नवी मुंबई येथे त्यांनी या पदावर सेवा केली. १९९७ मध्ये त्यांची पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती झाली. त्यानंतर त्यांनी पोलिस उपायुक्त, मुंबई शहर, सशस्त्र दल, पोलिस उपायुक्त ५ व ७, वाहतूक शाखा, विशेष शाखा सुरक्षा युनिट, संरक्षक दल, नियोजन आणि समन्वय तसेच ५१ हजार अस्थायी पदे स्थायी करण्याबाबत विशेष कामगिरी केली. सरसंपादक दक्षता म्हणून सेवा. पोलिस अधीक्षकपदी हिंगोली, सिंधुदुर्ग, पुणे रेल्वे, समोदशक रा. रा. पो. बल गट क्रमांक ११ नवी मुंबई, पोलिस उपायुक्त झोन ३ नागपूर. २०१७ मध्ये पदोन्नती झाल्याने अपर पोलिस आयुक्त ठाणे शहर, नागपूर शहर व जानेवारी २०१७ पासून नागपूर परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकपदावर आजपर्यंत कार्यरत आहेत. श्री. पाटणकर यांना यापूर्वी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, कठीण सेवापदक (नक्षलग्रस्त भागात काम केल्याबद्दल), आंतरिक सुरक्षा पदक मिळालेले आहे. राष्ट्रपती पोलिसपदकाचे वितरण लवकरच होणार आहे. 

भोसले कॉलेजच्या यशोशिखरात मानाचा तुरा
प्रतापसिंह पाटणकर हे कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. महाविद्यालयामध्ये वर्षभरापूर्वी ‘एक्‍स डीपीयन्स असोसिएशन’ स्थापन झाली असून, असोसिएशनच्या प्रथम अध्यक्षपदाची धुरा सर्वांनी त्यांच्यावर सोपवलेली आहे. राष्ट्रपतिपदक जाहीर झाल्याने महाविद्यालयाच्या यशोशिखरात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, प्राचार्य-प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.  

Web Title: satara news Presidential Medal