सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन करमाळकर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे रोजी समाप्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी आता डॉ. नितीन करमाळकर हे कार्यभार सांभाळतील. करमाळकर यांची नियुक्‍ती केल्याची माहिती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या कार्यालयाने बुधवारी कळविली. 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. कुलगुरुपदासाठी एकूण 90 अर्ज आले होते. त्यांच्या छाननीनंतर एकूण 36 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली. डॉ. नितीन करमाळकर यांच्यासह प्रा. एम. राजीवलोचन, प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. अंजली क्षीरसागर अशी काही नावे या 36 जणांच्या यादीत होती. 

कोण आहेत डॉ. नितीन करमळकर? 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. नितीन करमळकर गेल्या 25 वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणशास्त्र विभागप्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. विद्यापीठाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केले आहे.