ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ चिपळूणकर यांचे निधन 

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ चिपळूणकर यांचे निधन 

औरंगाबाद : ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर (वय 89) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झालेल्या चिपळूणकर यांनी राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणूनही अनेक वर्षे काम केले. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

विद्याधर विष्णू उर्फ वि. वि. चिपळूणकर यांचा जन्म 13 एप्रिल 1929 रोजी मुंबईत झाला. 1948 मध्ये शिक्षकी पेशा पत्कारलेले चिपळूणकर 1987 मध्ये राज्याच्या शिक्षण संचालकपदावरून निवृत्त झाले. शिक्षण संचालकपदाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले. "चिपळूणकर समिती'च्या अहवालामुळे सर्वपरिचित झालेल्या चिपळूणकरांनी ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या पाठिंब्याने शासकीय विद्यानिकेतनची संकल्पना साकारली. "उद्धरावा स्वये आत्मा' हे विद्यानिकेतनचे ब्रीदवाक्‍य त्यांनीच सुचवले होते. 

माध्यमिक शिक्षक, शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, बालभारतीचे संचालक, शिक्षण संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. 

शिक्षण क्षेत्रातील बदल आणि आव्हानांवर त्यांनी विपुल लेखन केले. सातारा जिल्ह्यातील नायगावला दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाला चिपळूणकर यांनी 1982 पासून अनौपचारिकपणे सुरवात केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com