लिंगबदल करून केलेल्या लग्नाचा वाद न्यायालयात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

मुंबई - मैत्रिणीवरील प्रेमापोटी आणि तिच्यासोबत आयुष्यभर राहण्यासाठी जेण्डर रिअसायन्मेंट सर्जरी (लिंगबदल) करून मुलगा बनल्यानंतर लग्न केलेला विशाल (नाव बदलेले) त्रास देत असल्याची तक्रार स्वाती (नाव बदललेले)ने केली आहे. 

मुंबई - मैत्रिणीवरील प्रेमापोटी आणि तिच्यासोबत आयुष्यभर राहण्यासाठी जेण्डर रिअसायन्मेंट सर्जरी (लिंगबदल) करून मुलगा बनल्यानंतर लग्न केलेला विशाल (नाव बदलेले) त्रास देत असल्याची तक्रार स्वाती (नाव बदललेले)ने केली आहे. 

स्वाती प्रसिद्ध डिझायनर आहे. विशालचा स्वभाव लग्नानंतर बदलला, तो आपल्याला स्वातंत्र्य देत नाही. तसेच, आपल्या व्यावसायिक कामात हस्तक्षेप करत आहे. तसेच त्याचे ऑपरेशनही नीट झाले नसल्याच्या संशयामुळे आपल्याला शारीरिक सुख मिळत नाही. तो त्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी आपल्याला मारहाण करतो आणि अपशब्द वापरतो, अशी तक्रार करत स्वातीने ठाणे न्यायालयात विभक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. स्वातीचे आरोप फेटाळत विशालनेही वांद्रे कौटुंबिक न्यायालयात तक्रार केली आहे. 

आपली आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने आणि स्वातीला व्यावसायिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी पैशाची गरज असल्याने तिने आपला वापर केल्याचा आरोप विशालने केला आहे. काही वर्षे एकत्रित राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतल्याचे व समाज काय म्हणेल, या विचारामुळेच कुटुंबीयांच्या विरोधात जात स्वातीच्या सांगण्यावरून आपण शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्याचा दावा विशालने केला आहे. हिंदू विवाह कायद्यान्वये अशा पद्धतीचे लग्न निरर्थक असल्याचे सांगून स्वातीने मागितलेली पोटगी देण्यासही विशालने विरोध केला आहे. 

Web Title: By sex marriage debate in the court of the change