शरद पवार यांचा सोलापुरात सर्वपक्षीय नागरी गौरव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

सोलापूर - महाराष्ट्राची विधानसभा व विधान परिषद, संसदेत लोकसभा व राज्यसभा अशा लोकशाहीच्या चारही सभागृहांत अखंडपणे पन्नास वर्षे काम करणारे शरद पवार हे देशातील एकमेव नेते आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 22 फेब्रुवारी 2017 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने त्यांचा फेब्रुवारीत सर्वपक्षीय नागरी सत्कार सोलापुरात करण्यात येणार असल्याची माहिती नागरी सत्कार समारोह समितीचे निमंत्रक महेश गादेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ""शरद पवार हे 22 फेब्रुवारी 1967 रोजी पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी विधानसभा, विधान परिषद, लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी एका सभागृहात प्रतिनिधित्व केले आहे. सोलापूरचे पालकमंत्री व माढ्याचे खासदार, देशाचे संरक्षणमत्री, कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यासोबत त्यांचे ऋणानुबंध असल्याने सोलापूर जिल्ह्यालाच आपल्या गौरवाचा मान मिळावा, अशी विनंती पवार यांच्याकडे केली. त्यांनी ही विनंती मान्य केली आहे.''

Web Title: Sharad Pawar civic pride in Solapur