शरद पवारांच्या विधानाने सर्वपक्षीय आमदार धास्तावले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यातील फडणवीस सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार असेल तर आपण त्यास हातभार लावू, अशा आशयाचे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पवार यांच्या विधानाने मध्यावधी निवडणुकांची शक्‍यता गडद झाल्याने सर्वपक्षीय आमदार धास्तावले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात दीडशेच्यावर आमदार आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही व्यक्‍त केली होती. "शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा करत आहे. शिवसेनेने बाहेर पडावे. आम्ही भाजप सरकारला मदत करणार नाही,' असेही अजित पवार म्हणाले होते. यानंतर शरद पवार यांनी यापुढे जात "आम्ही सरकार पाडण्यास मदतच करणार आहोत,' अशी भूमिका घेतली आहे. पवार यांच्या वक्‍तव्याने सर्वपक्षीय आमदार धास्तावले आहेत. अडीच वर्षांच्या कालावधीत निवडणुकीला सामोरे जाण्याची बहुसंख्य आमदारांची इच्छा नाही. सरकारच्या भवितव्याबद्दल सध्या सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये कुजबूज सुरू आहे.

Web Title: Sharad Pawar's statement