शेतकऱ्यांची वाट लावणारी "समृद्धी' नको - उद्धव ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

शिर्डी - समृद्धी महामार्गाच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवू नका. अशी शेतकऱ्यांची वाट लावणारी समृद्धी आम्हाला नको. पूर्वी अस्तित्वात असलेल्या महामार्गाचे रुंदीकरण करून त्यातून मार्ग काढता येईल का, यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करता येईल. शेतकऱ्यांनी एकजूट टिकविली, तर या संघर्षात शिवसेना तुमच्या सोबत राहील, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोपरगाव तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिली. 

पुणतांबे येथील मेळाव्याला जाण्यापूर्वी ठाकरे यांनी कोकमठाण येथे येऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. ठाकरे म्हणाले, ""मंत्रालयातील बाबू नकाशा काढण्यासाठी कागदावर रेघा ओढतात. इकडे शेतकऱ्यांच्या जमिनी जातात. अधिकारी आधी जमिनी खरेदी करतात. त्यांच्या जवळून महामार्ग नेऊन त्या जादा भावाने विकून टाकतात. मुंबई मेट्रोच्या आराखड्यात अकराशे इमारती पाडाव्या लागणार होत्या. शिवसेनेने विरोध केल्यानंतर ही संख्या दोनशेपर्यंत खाली आहे. येथे पर्यायी महामार्ग अस्तित्वात असेल तर नवा महामार्ग कशाला?'' 

""तुम्हाला जमीन हवी की अधिक मोबदला हवा? हे एकदा ठरवा. तुमच्यासाठी मी संघर्ष करायला तयार आहे. प्रत्येक वेळी तुमच्यावर वरंवटा फिरवून समृद्धी कशासाठी? तुम्ही नकाशा घेऊन मुंबईला या आपण यातून मार्ग काढू. शेतकऱ्यांची घरे आणि शेतांवर मी वरंवटा फिरू देणार नाही. तुमची एकजूट टिकवा, नाही तर मुख्यमंत्री मला म्हणायचे, "तुम्ही संघर्ष कुणासाठी करता?' सरकार व मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. शाप घेऊ नये,'' असे ठाकरे म्हणाले.